महाराष्ट्र आणि बदलत राजकारण
संपूर्ण देशावर किंबहुना अटकेपार झेंडा लावणाऱ्या मराठ्यांना स्वातंत्र्योत्तर भारतात आपला झेंडा दिल्लीवर लावण्यात कधीच यश आले नाही।अनेक नामीं राजकारणी विद्वान व्यक्तिमत्त्व असूनही मराठी लोकांना आपल्या सीमेपलीकडे आपली छाप सोडण्यात म्हणावं तितकं यश आले नाही।यशवंतराव चव्हाण ,शरद पवार,विलासराव देशमुख,प्रमोद महाजन गोपीनाथ मुंडे ,नितीन गडकरी यांनी वेगवेगळे झेंडे घेऊन दिल्ली वारी केली खरी पण याना मराठ्यांचा भगवा हाथी घेण्यात कदाचित कमीपणा आला असेल। चव्हाण काळात महाराष्ट तयार झाला खरा पण याचा प्रभाव दिल्लीवर कधीही दिसून नाही आला।याला कारण ही तेच होत जे शिवाजी महाराज्यांच्या स्वराज्य निर्मिती मध्ये आड आलं।स्वार्थ म्हणू किव्हा आपण मागे राहू ही भावना।मराठी नेत्यांना आपला 1 नेता म्हणून कुणालाही मोठं करता आलं नाही किंबहुना त्यांनी ते केलं नाही। कधी विलासरावांनी राजीव गांधींच्या आदेशान पवारांना विझवण्याचा प्रयत्न केला तर कधी पवारांनी स्वतःच स्वार्थ आणी राजकीय फायद्यासाठी स्वतःच्या पायावर कुऱ्हाड मारून घेतली। ...